Ad will apear here
Next
निवृत्त शिक्षिका कमल बावडेकर यांच्या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन
कमल बावडेकररत्नागिरी : येथील निवृत्त शिक्षिका श्रीमती कमल पुरुषोत्तम बावडेकर यांच्या ‘कमलकुंज’ या पुस्तकाचे प्रकाशन कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक आणि ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते ३० सप्टेंबर २०१८ रोजी रत्नागिरीत होणार आहे. अवेश्री प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

रविवारी सकाळी १० वाजता मारुती मंदिर परिसरातील जोगळेकर कॉलनी येथील दामले विद्यालयानजीकच्या लक्ष्मी-विष्णू सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून दूरदर्शन केंद्राचे सहायक संचालक जयू भाटकर उपस्थित राहणार आहेत. 

या पुस्तकामध्ये चाकोरीबाहेरच्या कथा, शब्दचित्र, प्रासंगिक लेखन, आत्मकथन लेखसंग्रह, गौरवपर लेख समाविष्ट आहेत. ८३ वर्षांच्या कमलताई बावडेकर म्हणजे उत्साहाचा मूर्तिमंत झरा. पेशाने त्या शिक्षिका होत्या. आयुष्यभर शिकवताना अनेक विषयांवर मनातल्या मनात चिंतन घडत गेले आणि सवड मिळताच त्या लिहीत गेल्या. त्यातूनच कमलकुंज हे पुस्तक लिहून पूर्ण झाले. कोकणातील जुन्या वळणाच्या वातावरणात आयुष्य कंठलेल्या एका मध्यमवर्गीय स्त्रीच्या प्रतिभेचा वाचकांना अनुभव देणारे हे पुस्तक आहे.

जास्तीत जास्त रसिक, वाचकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन मनीषा रेगे व राजश्री कामत यांनी केले आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZHUBS
Similar Posts
‘कमलताईंसारखी शिक्षिका आईसारखे संस्कार करते’ रत्नागिरी : ‘सरोवरातील कमळाचा कंद वर येऊन फुलल्यानंतर त्याचे सौंदर्य अधिक खुलते. तसेच कमलताईंनी आयुष्याचा कंद फुलवत आतापर्यंत जीवन जगताना अनुभवलेले क्षण, प्रसंग ‘कमलकुंज’ पुस्तकातून उलगडले आहेत. आई नसते, तिथे कमलताईंसारखी शिक्षिका असेल तर ती आईसारखेच संस्कार करते,’ असे गौरवोद्गार कोकण मराठी साहित्य परिषदेचे
नमिता कीर यांच्या ‘काळीजखोपा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन रत्नागिरी : ‘नमिता कीर यांच्या कविता खूप उंचीवरच्या आहेत,’ असे गौरवोद्गार कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व प्रमुख विश्वस्त पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांनी काढले. कीर यांच्या ‘काळीजखोपा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच रत्नागिरीत झाले. त्या वेळी ते बोलत होते. ‘कवीची महती मोठी असते, कवीचे
‘कोमसाप’तर्फे वाङ्मय पुरस्कारांसाठी आवाहन रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे (कोमसाप) कोकणातील सभासद साहित्यिकांना दरवर्षी वाङ्मयीन पुरस्कार दिले जातात. डिसेंबर २०१८मध्ये दिल्या जाणार्‍या वाङ्मयीन पुरस्कारासाठी कोकणातील साहित्यिकांकडून पुस्तके मागविण्यात येत आहेत. हे सर्व पुरस्कार ‘कोमसाप’चे कोकणातील सभासद असणार्‍या लेखकांसाठी आहेत.
‘कोमसाप’तर्फे वाङ्मय पुरस्कारांसाठी आवाहन रत्नागिरी : कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे (कोमसाप) कोकणातील सभासद साहित्यिकांना विविध वाङ्मय पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात. डिसेंबर २०१९मध्ये घोषित होणार्‍या वाङ्मय पुरस्कारासाठी पुस्तके मागविण्यात येत आहेत. हे सर्व पुरस्कार ‘कोसमाप’चे कोकणातील सभासद असणार्‍या लेखकांसाठी आहेत.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language